- Mahindra Thar ROXX : महिंद्रा कंपनीने आपल्या Mahindra Thar च्या ऑफिशियल एक्स पेजवर पोस्ट करत Thar ROXX ची लाँचिंग डेट जाहीर केली आहे. ‘THE’ SUV arrives on Independence Day या आशयाची पोस्ट महिंद्राकडून करण्यात आली आहे त्यामुळे इंडियन ऑटो मार्केट मधील बहुचर्चित SUV, ऑफ रोडिंग आणि एडव्हेंचरसाठी प्रसिद्ध असलेली महिंद्रा थार ( Mahindra Thar ) आपला नवा व्हेरिएंट रॉक्स ( Roxx ) 15 ऑगस्ट पासून बाजारात विक्रीसाठी आणणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नव्याने लाँच होणाऱ्या या SUV मध्ये 5 दरवाजे असणार आहेत.अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
महिंद्रा थार रॉक्स चे डिजाईन (Design of Mahindra Thar Roxx)
थार रॉक्स एसयूव्हीच्या स्टँडर्ड थार ला 5 दरवाजे असणार आहेत.या एसयूव्हीचे डिजाईन हे आधीच्या थार प्रमाणेच असेल मात्र थार रॉक्स ही तुलनेने थोडी मोठी असेल. 5 दरवाजे असलेली थार ची लांबी सुद्धा आधीच्या थारपेक्षा अधिक असेल.नव्या व्हेरिएंटला Cercular Motion LED हेडलाईट्स असतील आणि सोबत LED DRLs मिळतील.थारला असलेल्या फॉगलाईट आणि टर्न इंडिकेटरची डिजाईन ही पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आली आहे.या कारमध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सुद्धा मिळणार आहे. Mahindra Thar Roxx या एसयूव्हीचा मुकाबला Force Gurkha 5-Door या गाडीसोबत असणार आहे.
Four wheels never carried so much anticipation before. 'THE' SUV arrives on Independence Day. Stay tuned
— Mahindra Thar (@Mahindra_Thar) July 29, 2024
Know more: https://t.co/0t63tj3wYv#ComingSoon #THESUV #TharROXX #ExploreTheImpossible pic.twitter.com/P3FkukGMiS
टेस्टिंगच्या वेळी महिंद्रा थार Roxx ला अनेकदा भारतीय रस्त्यांवर पाहिले गेले.कंपनीने या गाडीचा टीजर एक्सवर पोस्ट केला आहे.एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या शराबी चित्रपटातील ‘इंतेहा हो गयी,इंतेजार की’ या गाण्याचा वापर केला आहे.एकंदरीतच भारतीय बाजारात थार विषयी असलेल्या क्रेझला या गाण्यामुळे अजून उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या गाडीचे अनावरण झाल्यानंतर गाडीचा संपूर्ण लूक लोकांना पाहायला मिळेल.