NSE IPO
NSE Building Mumbai

NSE IPO: नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चा धमाकेदार आयपीओ येणार ;2016 पासून आहे प्रलंबित

Spread the love

  • NSE IPO : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने आपल्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) च्या मंजुरीसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी (SEBI) कडे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) साठी अर्ज केला आहे.

NSE IPO News : एनएसईने मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना (shareholders) याची माहिती दिली.या महिन्याच्या सुरुवातीलाच दिल्ली उच्च न्यायालयाला एनएसईच्या लिस्टिंगबाबत कुठलीही नवीन रिक्वेस्ट आली नसल्याची माहिती सेबीने दिली होती.त्यानंतर लगेच ही बातमी आल्याने NSE आपल्या आयपीओसाठी सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.NSE च्या IPO ची योजना 2016
पासून प्रलंबित आहे. त्याच वर्षी, कंपनीने प्रथमच ड्राफ्ट रेड-हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला होता.

NSE IPO
Photo : NSE Website

NSE IPO: NSE वर गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) नुसार, नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्या 10 कोटींचा टप्पा ओलांडली आहे. खरं तर, गेल्या काही वर्षांत NSE वर गुंतवणूकदारांच्या नोंदणीत वाढ झाली आहे. मार्च 2021 मध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या 4 कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी 25 वर्षांहून अधिक काळ लागला. त्यानंतर सुमारे सहा-सात महिन्यांत प्रत्येकी एक कोटींची वाढ झाली आहे. शेवटचे एक कोटी गुंतवणूकदार अवघ्या पाच महिन्यांत NSE जॉईन झाले. 10 कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदारांचे सरासरी वय 32 वर्षे आहे, तर पाच वर्षांपूर्वी ते 38 वर्षे होते.

जून तिमाहीचे निकाल

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा नफा जून 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत वार्षिक 39 टक्क्यांनी वाढून 2,567 कोटी रुपये झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत NSE चे ऑपरेटिंग उत्पन्न 51 टक्क्यांनी वाढून 4,510 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एक्स्चेंजने चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तिजोरीत 14,003 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

NSE चा इतिहास

NSE ची स्थापना 1992 मध्ये झाली. हे एप्रिल 1993 मध्ये SEBI द्वारे स्टॉक एक्स्चेंज म्हणून ओळखले गेले आणि 1994 मध्ये घाऊक कर्ज बाजाराच्या लॉन्चसह ऑपरेशनला सुरुवात केली, त्यानंतर लगेचच कॅश मार्केट विभाग सुरू झाला.31 डिसेंबर 2023 पर्यंत, भारताच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने 2,266 कंपन्या सूचीबद्ध केल्या आहेत. NSE चे बाजार भांडवल जुलै 2024 मध्ये ₹456 लाख कोटी (US\$5.5 ट्रिलियन) होते, ज्यामुळे ते जगातील 9वे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज बनले. 


Spread the love

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *