Union Budget 2024

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्प 2024,दीर्घकालीन भांडवली नफ्यावर लावण्यात आलेला 12.5% कर हा “कर आकारणी सोप्पी करण्याच्या दृष्टिकोनातून-अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Spread the love

Union Budget 2024
23 जुलै, Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, दीर्घकालीन भांडवली नफ्यावर लावण्यात आलेला 12.5% कर हा “कर आकारणी सोप्पी करण्याच्या दृष्टिकोनातून लागू करण्यात आला आहे”

त्या पुढे म्हणाल्या,”आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या मालमत्ता वर्गासाठी काम करत आहोत आणि असे असताना जेव्हा दीर्घकालीन भांडवली नफ्यावर आकारलेला सरासरी 12.5% कर ही कर आकारातील प्रत्यक्षात झालेली घट आहे जी बाजारातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल.”तत्पूर्वी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2024 च्या अर्थसंकल्पाचे (Union Budget 2024) कौतुक केले.ते म्हणाले ” हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांवर तसेच उत्पादनावर लक्ष केंद्रित करणारा आहे.जो भारताच्या विकासाला गती देईल.” ते पुढे म्हणाले की,”अर्थसंकल्प मध्यमवर्गाला सशक्त करेल आणि दलित,आदिवासी व मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी काम करेल.या अर्थसंकल्पमुळे तरुणांपुढे अमर्याद संधीची दारे खुली झाली आहेत.हा अर्थसंकल्प शिक्षण आणि कौशल्याला नव्या उंचीवर घेऊन जाईल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


Spread the love

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *