Gold Investment

Gold : सोन्यात गुंतवणूक करताना कधी हा विचार केला आहे का ?

Spread the love

आपल्याकडं सोनं ( GOLD ) म्हणजे केवळ एक धातू नाही, तर भावनांचा विषय आहे. पारंपरिक सण, लग्नसमारंभ किंवा खास प्रसंगी सोनं खरेदी करणं ही अनेक कुटुंबांसाठी मानाची गोष्ट असते. त्याचवेळी, सोन्याला सुरक्षित गुंतवणूक ( Investment ) मानून त्यात पैसे गुंतवण्याची प्रथा सुद्धा आहे. पण आपण सोन्याच्या गुंतवणुकीकडे बघताना परताव्याचा विचार केला आहे का?

अनेकदा सोनं घेताना आपण त्यातले प्रत्यक्षातले खर्च आणि नंतर होणारे तोटे लक्षात घेत नाही. थोडक्यात सांगायचं झालं, तर सोनं खरेदी करणे आणि परत विकणे यामध्ये बरेच अदृश्य खर्च असतात.

सोन्याच्या गुंतवणुकीतील अदृश्य खर्च

उदाहरणार्थ, तुम्ही जर १० ग्रॅम (१ तोळा) सोनं घेतलं तर त्याची किंमत अंदाजे ७० हजार रुपये असू शकते. पण त्यावरच घडणावळीचा खर्च, जीएसटी, आणि नंतर विकताना येणाऱ्या वजावट यामुळे आपला प्रत्यक्ष परतावा लक्षणीयरीत्या कमी होतो.

  • घडणावळीचा खर्च: साधारणपणे १५०० रुपये किंवा त्याहून जास्त.
  • जीएसटी: साधारण १४०० रुपये म्हणजेच जवळपास ४-५% तोटा इथूनच सुरु होतो.
  • विक्री करताना कट्टी: तुम्ही सोनं विकायला गेलात तर सोनार जवळपास १ ते दीड ग्रॅम सोनं कमी करतो, यामुळे १५-२०% पर्यंत नुकसान होते.

शिवाय, जर ते दागिन्यांच्या स्वरूपात असेल, तर घडणावळीचा खर्च आणि कट्टी मिळून तुमचं एकूण नुकसान २५% पर्यंत जाऊ शकतं. यामुळे प्रत्यक्ष सोनं घेणं म्हणजे गुंतवणुकीसाठी महागडं ठरतं.

सोन्याच्या गुंतवणुकीसाठी पर्याय

तुम्ही जर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करत असाल तर प्रत्यक्षात सोनं घेण्यापेक्षा काही स्मार्ट पर्याय वापरू शकता:

  1. GOLD ETF (Exchange Traded Fund): सोन्याच्या भावानुसार याची किंमत ठरते आणि हे शेअर्सप्रमाणे ट्रेड केले जातात. अगदी ५०-६० रुपयांपासून याची गुंतवणूक सुरू करता येते आणि कधीही विकता येतं.
  2. GOLD FUND DIRECT PLAN: हे सोनं आधारित म्युच्युअल फंड आहेत, ज्यामध्ये सोन्याच्या दरात होणाऱ्या चढ-उतारांनुसार एनएव्ही बदलतो.
  3. SOVEREIGN GOLD BONDS (SGB): यात तुम्हाला प्रत्यक्ष सोनं मिळत नाही, पण तुमच्या गुंतवणुकीवर सरकार हमी देतं. यावर तुम्हाला २.५०% वार्षिक व्याज देखील मिळतं. पण याचा ८ वर्षांचा लॉक-इन पीरियड असतो.

सोन्यात गुंतवणूक करताना विचार

सोनं हे गुंतवणुकीचं सुरक्षित साधन आहे, पण प्रत्यक्ष सोनं घेणं म्हणजेच चांगली गुंतवणूक असं नाही. गुंतवणूक करताना भावनिक दृष्टिकोनाऐवजी परताव्याचा विचार करणं आवश्यक आहे. सोनं प्रत्यक्षात न घेता स्मार्ट पर्याय वापरल्यास तुम्हाला सोन्याच्या गुंतवणुकीत अधिक फायदा मिळू शकतो.तरच सोनं आपल्यासाठी “२४ कॅरेटचा नफा” घेऊन येईल, नाहीतर गुंतवणुकीचं सोनं पितळ ठरेल.

Gold Prices on 13th september: सोन्याच्या किमतीत वेगाने वाढ,पुढे काय होणार ? “Rapid Surge in Gold Prices, What Lies Ahead?”

InvestSmart #GoldRate


Spread the love

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *