Market News : आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. २० सप्टेंबर २०२४ रोजी सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) या दोन्ही निर्देशांकांनी (Index) ऐतिहासिक उच्चांक गाठले. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) तब्बल १,३६०.५१ अंकांनी वाढून ८४,५४४.३१ वर स्थिरावला, ज्याने दिवसाच्या व्यापारी सत्रात ८४,६९४.४६ चा उच्चांक गाठला. त्याचप्रमाणे, निफ्टी ५० (Nifty 50) ३७५.१५ अंकांनी वाढून २५,७९०.९५ वर बंद झाला, याने २५,८४९.२५ चा उच्चांक गाठला.
बाजारातील मुख्य घडामोडी
- सेन्सेक्स: ८४,५४४.३१ अंक (१.६३% वाढ)
- निफ्टी ५०: २५,७९०.९५ अंक (१.४८% वाढ)
जागतिक बाजारात होत असलेल्या तेजीमुळे भारतीय बाजारातसुद्धा त्याचे परिणाम दिसून आले. निफ्टीतील ५० पैकी ४४ स्टॉक्स हे ग्रीन मध्ये बंद झाले. महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), जेएसडब्ल्यू स्टील (JSW Steel), लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro) आणि कोल इंडिया (Coal India) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ५.३% पर्यंतची वाढ नोंदवली गेली.
टॉप गेनर्स आणि लूझर्स
- महिंद्रा अँड महिंद्रा: ५.४८% वाढ
- आयसीआयसीआय बँक: ३.६०% वाढ
- जेएसडब्ल्यू स्टील: ३.५०% वाढ
- लार्सन अँड टुब्रो: २.९९% वाढ
- भारती एअरटेल: २.८२% वाढ
निफ्टी ५० टॉप लूझर्स:
- ग्रासिम इंडस्ट्रीज: २.२२% घसरण
- स्टेट बँक ऑफ इंडिया: १.०४% घसरण
- इन्डसइंड बँक: ०.३१% घसरण
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: ०.२६% घसरण
- बजाज फायनान्स: ०.१०% घसरण
Market Update for the day.
— NSE India (@NSEIndia) September 20, 2024
See more:https://t.co/Y4Bi9cHRZQhttps://t.co/TWutUNV8aU#NSEUpdates #Nifty #Nifty50 #NSEIndia #StockMarketIndia #ShareMarket #MarketUpdates pic.twitter.com/k3BYQbMdER
बँक निफ्टी (Bank Nifty) च्या घडामोडी
बँक निफ्टीने ५३,०३७.६ अंकावर व्यापार पूर्ण केला. यामध्ये दिवसभरात ५४,०६६.१ चा उच्चांक गाठला होता. बँक निफ्टीने गेल्या वर्षभरात १८.६१% वाढ नोंदवली आहे.
सेक्टोरल इंडेक्समध्ये वाढ
सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी (Index) सकारात्मक कामगिरी दर्शवली. निफ्टी रिअल्टी निर्देशांकाने ३.०५% वाढ दर्शवली, तर बँक निफ्टी, फायनान्शियल सर्व्हिसेस, ऑटो, एफएमसीजी, मेटल आणि प्रायव्हेट बँक निर्देशांकाने १% पेक्षा जास्त वाढ नोंदवली.
तेजी कायम राहणार ?
आज शेअर बाजाराच्या सर्व व्यवहारांमध्ये तेजी दिसून आली. शेअरधारकांसाठी आजचा दिवस अत्यंत फायदेशीर ठरला. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरने ५.४८% ची वाढ नोंदवली, तर आयसीआयसीआय बँक आणि लार्सन अँड टुब्रोने देखील चांगली कामगिरी केली. तर, दुसरीकडे, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात किंचित घसरण झाली.
शेअर बाजारातील आजचा दिवस आशादायक असल्याचे सिद्ध झाले आहे, आणि येणाऱ्या काही दिवसांमध्येही बाजारात तेजी राहण्याची शक्यता आहे.असे असले तरीही बाजारातील अस्थिरतेची शक्यता कायम असल्याचे तज्ञांचे मत आहे. बाजाराने उचांक गाठला असताना नफावसुली (Profit Booking) होण्याची शक्यता असते.त्यामुळे गुंतवणूकदारांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
Fed Rate Cut : फेडरल रिझर्वची ०.५० % व्याजदर कपात ; भारतीय शेअर बाजार उसळी घेणार ?