आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या एनडीए सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘विकसित भारत’ या थीम अंतर्गत बजेट सादर केले. या बजेटमध्ये युवकांना नोकरी मिळण्यापासून अनेक पायाभूत सुविधांवर भर दिल्याचे दिसून आले. बजेटनंतर कोणत्या सेक्टरवर गुंतवणूकदारांची नजर असेल पाहुयात.
- GOLD – सोने : या बजेटमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरला तो म्हणजे सोने चांदीवरील कमी करण्यात आलेल्या सीमा शुल्काचा.या निर्णयामुळे सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली आहे. सीमा शुल्क म्हणजेच बेसिक कस्टम ड्युटी कमी केल्याने सोन्यातील गुंतवणूक अधिक आकर्षक होईल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.ह्याचा सर्वात जास्त फायदा ज्वेलरी सेगमेंट ला होऊ शकतो.सरकारने सोन्यावर असलेली 15% कस्टम ड्युटी कमी करून 6 टक्क्यांवर आणल्याने भारतीय बाजारातील TITAN,Mannpuram Finance,Kalyan jewellers यांसारख्या स्टॉक्समध्ये रेलचेल पाहायला मिळू शकते.
- Skill Development – कौशल्य विकास : 2024 च्या आर्थिक बजेटमध्ये ज्या विशेष तरतुदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ती थीम म्हणजे Skill Development.सर्वात जास्त तरुणांची संख्या असलेल्या आपल्या भारत देशासाठी बेरोजगारीचा वाढता दर ही मोठी समस्या आहे.कौशल्य विकासावर घोषणा करून सरकारने सूचित केले आहे की येणाऱ्या काळात बेरोजगारीवर मात करण्यासाठी मोदी सरकार सक्षम आहे.या घोषणेमुळे नोकरी निर्माण करणाऱ्या व कौशल्य विकासाचे (Skill Development) ट्रेनिंग देणाऱ्या कंपन्या येणाऱ्या काळात नफ्यात राहण्याचे संकेत आहेत. उदा- Veranda Learning, NIIT,QUESS CORP LTD.
- FMCG : बजेटमध्ये कंसप्शनसाठी 2.66 लाखाचा निधी आरक्षित केल्याने FMCG सेक्टरमध्ये खासकरून Dmart,HUL, Britannia,Godrej Agrovet यांसारख्या शेअर्समध्ये तेजी येऊ शकते.
- Power & Infrastructure : पॉवर आणि इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी बजेटमध्ये विशेष घोषणा केली गेली नसली तरी नियोजित प्रकल्प सुरू राहतील असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे Power आणि Infrastructure या सेक्टरमध्ये सुरू असलेली तेजी पुढेही कायम राहण्याचे अंदाज आहेत.नवीन मीटर,ट्रान्समिशन यांसारख्या उपकरणांवर काम करणाऱ्या Hitachi Energy या स्टॉक वर लक्ष ठेवायला हरकत नाही.
- Reality Sector : सातत्याने मोदी सरकार PMAY म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेवर भर देत असल्याचे दिसून येत आहे.यामुळे Reality Sector मधील कन्स्ट्रक्शन पूरक साहित्य पुरवणाऱ्या कंपन्यांच्या नफ्यामधील वाढ येणाऱ्या काळात कायम राहील असे तज्ज्ञांचे मत आहे.उदा- ASTRAL , APL, APOLLOPIPE .