IND vs SL T20I Series : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या दरम्यान तीन टी-२० सामने खेळविले जाणार आहेत.तत्पूर्वी मालिका सुरू होण्याआधीच श्रीलंकेसाठी मोठा धक्का बसलाय. संघातील ३२ वर्षीय गोलंदाज दुष्मंथा चमीरा दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेलाय तर त्या पाठोपाठ आता अजून एक खेळाडू संघाबाहेर गेला आहे.
चमीराच्या जागी बदली खेळाडू म्हणून असिथा फर्नांडोचा समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंका संघाचा स्टार वेगवान गोलंदाज नुवान तुषार हा देखील चमीरा पाठोपाठ मालिकेबाहेर गेला आहे. २७ तारखेला खेळावल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याच्या आधी सराव करताना नुवान तुषारा च्या बोटाला दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे तो ह्या मालिकेतील एकही सामना खेळू शकणार नाही.दरम्यान तुषाराच्या जागी दिलशान मधूशंकाचा समावेश श्रीलंकेच्या संघात केला जाऊ शकतो असे चिन्ह आहेत.
भारता विरुद्धच्या T20Is साठी श्रीलंकेचा संघ: चरित असलंका (कर्णधार),थुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शानाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालागे, महेश तीक्ष्णा चमिंडू विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो आणि असिथा फर्नांडो
IND vs SL T20I