Women's Asia Cup

Women’s Asia Cup : मिशन सेमी फायनल, महिला आशिया कप मध्ये भारताचा सामना २६ तारखेला.

Spread the love

Women’s Asia Cup : महिला आशिया कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या अंतिम चार संघांची नावे निश्चित झाली आहेत.महिला आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपले असून भारतासह अन्य तीन संघांनी आपला उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.

‘अ’ गटातून भारत आणि पाकिस्तान संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. अ गटातून भारताने तिनही सामने जिंकत पॉईंट टेबल मध्ये एक नंबरचे स्थान पटकावले तर पाकिस्तान दोन सामने जिंकत दुसऱ्या स्थानी राहिला.

‘ब’ गटातून तीन सामने जिंकत श्रीलंकेने तर तीनपैकी दोन सामने जिंकून बांग्लादेशने आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

उपांत्य फेरीतील लढती पुढील प्रमाणे :

२६ जुलै – भारत विरुद्ध बांग्लादेश,ठिकाण- डंबूला, वेळ – दुपारी २ वा.

२६ जुलै – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान,डंबूला, वेळ – सायंकाळी ७ वा.

Women's Asia Cup

Women’s Asia Cup अंतिम सामना २८ जुलै रोजी संध्याकाळी वाजता डंबूला येथे होईल.उपांत्य फेरीतील लढतीमुळे फायनलमध्ये पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.संपूर्ण स्पर्धेत भारताची कामगिरी उत्तम राहिली असून संघाची मदार कर्णधार हरमनप्रीत कौर व सलामी फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मनधना यांच्यावर असेल.फलंदाजीत रिचा घोष आणि जेमिमाह रोड्रिग्ज मॅच फिनिशर ची भूमिका बजावू शकतात.
तर संपूर्ण स्पर्धेत ८ विकेट्स घेणाऱ्या दीप्ती शर्मावर गोलंदाजीची धुरा असेल.भारतीय गोलंदाज श्रेयांका पाटील दुखापतग्रस्त असल्याने दिप्तीसह रेणुका ठाकूर आणि राधा यादव यांच्या कामगिरीकडे सुद्धा सर्वांचे लक्ष असेल.

Women's Asia Cup

Spread the love

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *