Hindenburg Research

Hindenburg Research Adani News हिंडेनबर्ग चा धक्कादायक खुलासा ; अदानी मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या अस्पष्ट ऑफशोर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांचा हिस्सा.

Spread the love

SEBI: अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडेनबर्गने (Hindenburg Research) आपल्या नवीन अहवालात सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची नावे कथित अदानी घोटाळ्याशी जोडल्याचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानुसार, या दोघांची अस्पष्ट ऑफशोअर फंडात हिस्सेदारी होती. मात्र, सेबीकडून यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सेबी 18 महिन्यांपासून गप्प आहे; जून 2024 मध्ये कारणे दाखवा नोटीस पाठवली – हिंडेनबर्ग
नवीन अहवाल जारी केल्यानंतर, हिंडेनबर्ग ने सांगितले, अदानी समूहावरील आमच्या मूळ अहवालाला जवळपास 18 महिने उलटून गेले आहेत. भारतीय व्यावसायिक समूह (अदानी) कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यात सामील असल्याचे भरपूर पुरावे सादर केले गेले आहेत. तथापि, ठोस पुरावे आणि 40 हून अधिक स्वतंत्र मीडिया तपास असूनही, SEBI ने अदानी समूहाविरुद्ध कुठलीही कारवाई केली नाही. कारवाई करण्याऐवजी, SEBI ने आम्हाला जून 2024 मध्ये स्पष्ट ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली.

सेबीकडून त्वरित प्रतिसाद नाही.
मॉरिशसमधील अदानी समूहाच्या काळ्या पैशाच्या नेटवर्कची संपूर्ण माहिती देऊनही कारवाई होत नाही. गुप्त कागदपत्रांचा हवाला देत हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) म्हटले आहे की, अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोअर संस्थांमध्ये सेबी अध्यक्ष आणि त्यांच्या पतीची हिस्सेदारी होती. या संस्था अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी चालवतात. मात्र, या प्रकरणी सेबीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही
Hindenburg Research

माधवी पुरी बुच यांनी स्वतःचे शेअर्स त्यांच्या पतीला हस्तांतरित केलेहिंडेनबर्ग रिसर्च

माधवी पुरी बुच यांनी स्वतःचे शेअर्स त्यांच्या पतीला हस्तांतरित केल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2022 पर्यंत, माधवी पुरी बुच या SEBI च्या सदस्य आणि अध्यक्ष होत्या. सिंगापूरमधील Agora Partners नावाच्या सल्लागार कंपनीत त्यांची 100 टक्के भागीदारी होती. 16 मार्च 2022 रोजी SEBI चेअरपर्सन म्हणून त्यांची नियुक्ती होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी, माधवी बूच यांनी कंपनीतील स्वतःचे शेअर्स त्यांच्या पतीच्या नावावर हस्तांतरित केले.

गेल्या वर्षी अदानी समूहाला मोठा धक्का बसला होता.

गेल्या वर्षीच या कंपनीने एका अहवालाद्वारे अदानी समूहाला मोठा धक्का दिला होता. जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाला टारगेट करणारा अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालाने शेअर बाजारात खळबळ उडवून दिली होती, कारण हिंडेनबर्ग यांनी अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले होते. हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर शेअर बाजारात भूकंप झाला होता. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अदानी समूहाचे बहुतांश शेअर्स सातत्याने घसरत होते. आर्थिक नुकसानीचा अंदाज यावरून लावता येतो की, हा अहवाल येण्यापूर्वी गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश होते, मात्र नकारात्मक बातम्यांमुळे ते ३६ व्या क्रमांकावर घसरले होते.

हिंडेनबर्ग रिसर्च म्हणजे काय?
हिंडेनबर्ग रिसर्च ही यूएस फॉरेन्सिक आर्थिक संशोधन कंपनी आहे. त्याची स्थापना नाथन अँडरसन यांनी 2017 मध्ये केली होती. या कंपनीचे काम इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करणे आहे. हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg) कोणत्याही कंपनीत होणारे गैरव्यवहार शोधते. यानंतर,ते कंपनीत होणाऱ्या गैरव्यवहाराबद्दल अहवाल प्रकाशित करतात.


Spread the love

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *