23 जुलै, Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, दीर्घकालीन भांडवली नफ्यावर लावण्यात आलेला 12.5% कर हा “कर आकारणी सोप्पी करण्याच्या दृष्टिकोनातून लागू करण्यात आला आहे”
त्या पुढे म्हणाल्या,”आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या मालमत्ता वर्गासाठी काम करत आहोत आणि असे असताना जेव्हा दीर्घकालीन भांडवली नफ्यावर आकारलेला सरासरी 12.5% कर ही कर आकारातील प्रत्यक्षात झालेली घट आहे जी बाजारातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल.”तत्पूर्वी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2024 च्या अर्थसंकल्पाचे (Union Budget 2024) कौतुक केले.ते म्हणाले ” हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांवर तसेच उत्पादनावर लक्ष केंद्रित करणारा आहे.जो भारताच्या विकासाला गती देईल.” ते पुढे म्हणाले की,”अर्थसंकल्प मध्यमवर्गाला सशक्त करेल आणि दलित,आदिवासी व मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी काम करेल.या अर्थसंकल्पमुळे तरुणांपुढे अमर्याद संधीची दारे खुली झाली आहेत.हा अर्थसंकल्प शिक्षण आणि कौशल्याला नव्या उंचीवर घेऊन जाईल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.